ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 42

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४२

सांवळिया तेज सांवळा श्रीहरि । शेजबाजवोवरी ब्रह्मांडाची ॥ गृहदारा दिनमणी तेज देऊनि मेदिनी । मेरू प्रदक्षणि आप होये ॥ ऐसा हा सांवळा सतेज साजणी । म्यां आपुल्या अंगणी देखीयेला ॥ ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचे । मी माझे मोहाचे हरिरूप ॥

 अर्थ:-

 सावळा श्रीहरि सावळ्या तेजाने तळपत असुन त्यांने ब्रह्मांडाच्या बाज करुन त्यावर शेज केले आहे. घरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करुन तो मेरु प्रदक्षिणा करत आहे. हे सखी असा तेजःपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला. हे सखी त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेले तर मोहच हरिरुप झाला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading