ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.325

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३२५

एक पाहतां दुजे गेलें । शेखी पाहतां सर्व शून्य जालें ॥ पाहातां तयाचा विचारू । निवृत्ति जाणे तो श्रीगुरू ॥ एक मूळ एक आदि । शून्य मांडिली उपाधि ॥ निवृत्तिदासाचे बोलणें । जाणा मीपणा उमाणे ॥

अर्थ:-

ब्रह्माविषयी पाहु गेले असता. तेथे द्वैत व अद्वैत किंवा एकत्व अनेकत्व ही भाषा संपते. त्या श्रुती वाक्याप्रमाणे सर्वाचे अधिष्ठान ब्रह्मच ठरते. ह्या संबंधीचा विचार श्रीगुरु निवृतीरायांच्या कृपेने केला आहे. शुन्य उपाधीने हा परमात्मा या जगाचे आदीमुळ आहे. माझे हे बोलणे मीपणा टाकुन समजुन घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading