ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.324

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३२४

अलाडु आडु पालाडु आडु मध्ये वाहे पाणी । तिहीं संधी खेळु मांडिला सीतादेवी राणी ॥ सुखाती चांदणे राती । बहुते खेळती येकु देखो ॥ खेळता खेळतां नवल पाहे । देखणा खिर खाये । सांपडे ते कोण्हा न संगे भोग्या शिवोन राहे ॥ भोगिया शिवोन उतरला डायीं । ज्ञानदेव सांगे निवृत्तीच्या पायीं ॥

अर्थ:-

अलिकडची कड व पलीकडची कड या दोन्हीच्या मध्ये नदीच्या पाण्याचा ओघ असतो. त्या ओघांत रात्री खेळ मांडला. सीतादेवी प्रमाणे स्वच्छ जी चांदणी रात्र तिच्यामध्ये अतिशय आनंद असून ब्रह्मदृष्टीने सर्व गोपाळ खेळ खेळत आहेत. त्यामध्ये असा चमत्कार आहे की तो खेळ खेळत असता त्यातील आनंद ज्ञानवान भक्तच भोगतो. त्या आनंदाचा लाभ कोणालाही वर्णन करता येत नाही. आपण भोक्ते व तो आनंद भोग्य आहे. अशा द्वैत भावाला भिऊन तो ज्ञानवान गडी त्या डावातून पार पडला. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने ह्या आनंदाचा मी अनुवाद केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading