ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.312

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१२

पढियंते कीरु जाणसी तरी । तो ठावो दृष्टीसी दूरी । सिंहुरी मोकारेवीण प्रतिबिंबासी । चेतना लाहे ऐसे कीजे रया ॥ आवडी वेचूनियां डोळिया । पुढे रिता कां रिगतोसी । तूंचि तूं सर्वाभूतीं ऐसे जरी जाणसी । तरी साचे भेटी केउता जासी रया ॥ अरे हा दुजेवीण खेळु मांडिला । हरिजैत अनुठायीं नाही । बापरखुमादेविवरा विठ्ठला । तुज जाणतयासी काय जाणणे रया ॥

अर्थ:-

हे पांडुरंगा तुला प्रेमळ भक्त. सगुण रुपाने जाणतात तथापि वास्तविक जाणावयाचे तुझे निर्गुण रुप ते त्यांच्या दृष्टीला दूरच असते. सिंह मोकळा नसून विहीरीजवळ बांधलेला असेल तर आपले प्रतिबिंब विहीरीत पाहून त्याच्याशी ऐक्य करण्याची जशी त्या सिंहाला चेतना उत्पन्न होते. त्याप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुझे यथार्थ स्वरुप पाहाण्याची चेतना त्या प्रेमळ भक्तांना उत्पन्न व्हावी असे कर. त्याचे निर्मळ प्रेम पाहून त्याच्या डोळ्यापुढे सगुण रूपाने का प्रगट होतोस ? जर तुला ठाऊक आहे की, या सर्व भूतमात्रामध्ये आपणच व्याप्त तरी मग त्यांना निर्गुण रुपाने भेट देण्याचे सोडून सगुणरुपाने भेट देण्याच्या आवडीने का जातोस. अरे दुसरेपणावाचून हा द्वैताचा खेळ तू मानला असून त्यांत निर्गुण रुपाने तुला पहाणायाचा जय किंवा सगुणरुपाने पाहणारयाचा पराजय पण हे दोन्हीही जय, पराजय तुझ्या स्वरुपावाचून दुसरीकडे नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठला तुम्ही असा विचार कर की त्या भक्तांना तुझे निर्गुणरुप जाणण्याशिवाय दुसरा काय विषय आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading