ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.313

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१३

मन मुरे मग जें उरे । ते तूं कां रे सेवीसिना ॥ दिसते परी न धरवे हातें । ते संताते पुसावें ॥ तेथीचीं खुण विरुळा जाणे । निवृत्ती प्रसादें ज्ञानदेव म्हणे ॥

अर्थ:-

मनांतील संकल्प विकल्प नाहीसे झाल्यावर ते मन मनपणाने शिल्लक राहात नाही त्याठिकाणी परमात्माच एक शिल्लक राहतो. त्याचे ज्ञान तूं का करुन घेत नाहीस. तो परमात्मा ज्ञानाने दिसतो.. तरी पण तो निराकार असल्यामुळे त्याला हाताने धरता येत नाही. अशा त-हेचा जो परमात्मा त्याचे ज्ञान होण्याकरिता संतांना नम्र होऊन मला त्या परमात्म्याचे ज्ञान करुन द्या अशी विनंती करावी लागते. व हे वर्म क्वचित लोकांनाच कळते. संतांचे कृपेने ज्ञान होते हे मला श्रीनिवृत्तीरायांच्या प्रसादाने कळले असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading