ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.315

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१५

नाही तें तूं काय गिळीसी । आत्मा वोळखोनी होय तत्त्वमसी ॥ सांडी सांडी सगुणाची भ्रांतीसी । तुंचि निर्गुण आहासी तत्त्वमसी ॥ रखुमादेविवरु विठ्ठलु पंढरीयेसी । कांही न व्हावा अवघा होसी ॥

अर्थ:-

तू पंचाग्नी साधन करुन धूराचे घोट का घेत बसला आहेस त्याचा एक उपयोग नाही उलट तत्त्वमसि महावाक्योपदेशाने आत्म्यास ओळखुन घे. याप्रमाणे ब्रह्मज्ञान करुन घेऊन परमात्म्याचे सगुण स्वरुपराविषयीची भ्रांती टाकून दे. अरे तत्त्वमसि महावाक्यांनी सांगितलेले निर्गुण ब्रह्म स्वतः तुच आहेस.याचा अर्थ रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मीच आहे असा तुझा निश्चय होईल म्हणजे तुझ्यामध्ये व परमात्म्यामध्ये भेद राहाणार नाही असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading