ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.316

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१६

पाहणेचिं पाहासी काय । पाहणे तेथे नाही । पाहणेची पाहीं ।पाहणे रया ॥ खुटले बोलणे बोली बोला । बोलुचि मौन्य ठेला मौन्यामाजी ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाचिये खुणे । अनुभविया बोलणे पारुषलें ॥

अर्थ:-

घटपटादि अनात्म दृश्य पदार्थ काय पाहत बसला आहेस. पदार्थात पाहणे म्हणजे आत्मा नाही. याकरिता दृश्य पदार्थ पाहाण्याचे टाकून दे पाहण्यास योग्य असा आत्माच पहा. आत्मा च पाहिलास म्हणजे आत्मज्ञान झाले, तर त्या ठिकाणी बोलणे खुंटते. म्हणजे शब्द मावळतो. त्या बोलण्याचे मौन निःशब्द आत्म्याच्या ठिकाणी होते. रखुमादेवीचे पती माझे पिता श्री विठ्ठल, त्याला पाहण्याची म्हणजे अनुभवण्याची खूण श्रीगुरुकृपेने प्राप्त होऊन बोलणेच खुंटुन जाते, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

Leave a Reply