नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९२४
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥
तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥
भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । मुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
अर्थ
आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी तो सेवन करु. जसा गोड पदार्थ कितीही अडचणीत ठेवला तरी तेथे जातेच अगदी त्याप्रमाणे आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी मुंगी तो पदार्थ सेवन करते. हे माझ्या जीवा अगदी त्या मुंगीप्रमाणे तू होय आणि केशवाचे चरण कधीही सोडू नको आणि विषयाचा हेवा करणारी माझी बुध्दी नेहमी सर्वकाळ ओस पडो. भुकेला कुत्रा असावा आणि त्याला अन्न मिळावे, तर तो कुत्रा एकवेळ प्राण सोडून देईल परंतू तोंडातले कधीही सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो कामातूर झालेल्या मनुष्याने आपले मन कधी जिंकले आहे काय आपला जीव देखील कामवासनेपुढे तो गवताप्रमाणे मानतो. व्याभिचारी स्त्रीचा भोग घेण्याकरता तो तिच्या मागे मागे फिरत असतो अगदी त्याच जातीची माझी भक्ती आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
