नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८०६
तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥
आतां दोहीं पक्षीं लागलें लांछन । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥
एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न बैसे चपळ मन ठायीं ॥२॥
पायीं महत्वाची पडिली शृखळा । बांधविला गळा स्नेह हातीं ॥३॥
शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा रुचेचीना ॥४॥
तुका म्हणे झला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा आळस बहु ॥५॥
अर्थ
देवा तुम्ही माझा अंगीकार करावा हा विचारच माझ्याजवळ राहीला नाही. त्यामुळे देवा आता देव आणि भक्त या दोन्हीही पक्षांना लांछन लागले आहे देवभक्तपणाला या गोष्टींमुळे लज्जास्पदरुप आले आहे. देवा माझे मन एकांती एकटे निश्चळ व एका ठिकाणी बसत नाही ते अतिशय चपळ झाले आहे. माझ्या पायात मोठेपणाची श्रृंखळा आणि या भवसागरातील स्नेहबंधनाने म्हणजे मोहाने गळा बांधला गेला आहे. माझ्या मुखाला कदान्न तर आवडतच नाही चांगले चांगले खाणे आवडते आणि शरीर विषयसुखाला सोकलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आळस आणि निद्रा हे माझ्या शरीरामध्ये खूप वाढले आहे त्यामुळे अवगुणांना माझ्या शरीरामध्ये स्थान मिळाले आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
