नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८४८
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हेचि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥
येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्यां ॥ध्रु.॥
उगाच सारवा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
तुका म्हणे नव्हे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशा तैसें ॥३॥
अर्थ
वैरागर नावाचा मणी असतो तो काय करतो तर वाळूच्या खड्यांना स्पर्श करताच त्यांनाही रत्न करुन टाकतो त्यामुळे ज्याच्याजवळ वैरागर नावाचा मणी आहे त्यांनी आपल्याला हवे तेवढे रत्न करुन घेऊन आपली आवड आपली इच्छा पूर्ण करुन घ्यावी. अहो येथे तर्क किंवा वितर्क करण्याची काहीच गरज नाही खऱ्या खोटयाचा निवाडा येथे होत असतो. भोजन पंक्तीत जर वाढणारा व्यक्ती चतुर असेल तर आपण केवळ पात्रासमोर बसावे व जे जे समोर येईल ते ते खावे कारण वाढणारा व्यक्ती चतुर असतो तो आपल्या मनातील सर्वभाव जाणून घेत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणत्याही काळी एखादया झऱ्यातून कितीही पाणी नेले तरी तो झरा वाहतच असतो व तेथे पाणी जसेच्या तसेच राहाते ते कधीही संपत नसते त्याप्रमाणे आपण भगवंताच्या या ठिकाणी एक शांततेने त्याचे चिंतन चित्तात करावे व त्याचे चिंतन दुसऱ्यालाही दयावे ते कितीही वाटले तरी संपत नाही.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
