२७६०, अभंग :- कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२७६०
कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥
न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ध्रु.॥
घरोघरीं झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडावी ॥२॥
तुका म्हणे आम्हां भाकितां करुणा । भलताचि शाहाणा शोध काढी ॥३॥

अर्थ

आम्ही आमची उपदेशरुपी वाणी कोठे खर्च करावी आणि आमचा उपदेश जाणून घेऊन ते मनावर कोण घेणार आहे ? देवा त्यामुळे तुम्ही आता माझी टाळाटाळी व हेळसांड करु नये तुम्ही जर माझी टाळाटाळ केली तर माझी या कलियुगामध्ये फजिती होईल. देवा अरे सत्याचा अनुभव तर कोणालाही नाही परंतू शब्दज्ञानाच्या गोष्टी घरोघरी चालू आहेत त्यामुळे मी कितीही माझी वाणी खर्च करुन हरीकथा सांगितली तरी कोणीही ती कथा मनावर घेणार नाही व त्या कथा जाणून घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुम्हाला करुणा भाकीत असताना एखादा भलताच शहाणा मनुष्यमध्येच येतो आणि मला वेगळेच काहीतरी सांगून मी तुम्हाला करुणा भाकीत असताना जे वचन बोललो त्यामध्ये वेगळेच शोध काढत बसतो.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading