नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७३७
न करीं रे मना कांहीच कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥
येथें सुखाचिया अमुपची रासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं ॥ध्रु.॥
सुखाचें ओचिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें होईल विसांवा । तुटतील धावां पुढिलिया ॥३॥
अर्थ
हे मना तू कोणत्याही प्रकारच्या कल्पना करु नकोस केवळ या विठोबाचे चरणाचे चिंतन कर. अरे मना या विठोबाच्या चरणाजवळ अमूप सुखाच्या राशी आहेत आणि सुखाच्या राशीपुढे कोणत्याही कल्पनेला ठावच राहणार नाही. या विठोबाचे श्रीमुख म्हणजे सुखाचे उरलेले साजिरे स्वरुपच आहे आणि ते स्वरुप पाहिले की शोक मोह दु:ख हे नाश पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मना विठोबाच्या चरणाजवळच तुला विसावा मिळेल आणि जन्ममरणाचे पुढे धावाच तुटून जातीन.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
