२७२७, अभंग :- दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२७२७
दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥१॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्वीजा हातीं नेदी रुका ॥२॥
करी पाहुणेर व्याह्याजावयासी । आल्या अतीतासी पाठीमोरा ॥३॥
तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण धरातळी ॥४॥

अर्थ

मनुष्य दगडाच्या देवापुढे बगाडीचा नवस करतो आणि बायकोला गाडीला बांधून तिला देवापुढे उभा करतो परंतू त्या बाईला कधी हरीकथेला जाऊ देत नाही. काही मनुष्य पुष्कळ पैसे खर्च करुन आपल्या पूर्वजांचे थडगे स्मशानात बांधतात परंतू आपल्या दारामध्ये तुळशीचे वृंदावन बांधणे वाईट मानतात. चोर त्यांच्या घरात घुसून त्याला सर्व लुटून जातात परंतू त्याविषयी त्याच्या मनाला अजिबात खंत वाटत नाही याउलट आपण आणखी पैसे कमवू असे तो मनाशीच निश्चय करुन अपेक्षा करतो परंतू ब्राम्हणाच्या हातात कधी एक रुपया देखील देत नाही. घरी व्याही किंवा जावई पाहुणे म्हणून आले तर त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करतो परंतू कोणी अतिथी दिसला की त्यांना तो पाठमोरा होतो म्हणजे त्यांच्याकडे पाठ फिरवतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या जगण्याला आग लागो त्याच्या जगण्याचा धिक्कार असो तो केवळ धरतीला भार असून सर्वांना त्रासच देत फिरतो.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading