नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२६६३
सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥
म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥
कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळिचया मुळें स्थिरावलें ॥२॥
लेवविलो अंगीं आपलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥
सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥
तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥
अर्थ
देवा मी तुझे एकुलते एक लाडके लेकरू झालो आहे वडीलही आम्हीच आणि धाकटेही आम्हीच झालो आहोत. त्यामुळेच तर तू आमच्याशी गोड बोलतोस आमचा कधी अव्हेर करत नाही आणि आम्हाला प्रेमाने खाऊ घालतोस. देव आमच्यापासून काहीही एक वेगळे ठेवत नाही आम्हाला कधी तो वंचितही करीत नाही त्यामुळे आमचे चित्त जे मूळ आहे “नीजस्वरुप” त्या ठिकाणी स्थिर झाले आहे. देवाने त्याचे सर्व अलंकार आभूषणे आमच्या अंगावर घातली आहेत. या देवाच्या पारमार्थिक धनाचे भांडार इतके आहे की ते कितीही खर्च केले तरी खर्च होत नाही ते शिल्लकच राहाते आणि त्याचा अंत:पारही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला आम्ही आवडीने आळवितो व यापुढेही आळवू त्यामुळेच तर देवाने एवढा मोठा लाभ आम्हाला दाखविला आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
