२६४९, अभंग :- ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२६४९
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥
आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥
करूनि सांभाळीं राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥
तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाहीं येथें चित्त देणें ॥३॥

अर्थ

मी इमान ठेवून माझ्या धन्याच्या चरणाजवळ राहिलो आहे त्याच्यामुळेच तर माझा धनी माझ्यावर कृपा करतो. आमच्याकडे धन्याचे म्हणजे देवाचे भांडारच आहे त्याचे जतन आम्हाला करावे लागते आणि तेथे कोण चांगला कोण वाईट येतो जातो याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. देवाने त्याच्या भांडाराचे सांभाळ करण्यासाठी आमची निवड केली आहे आणि तो यापासून वेगळा राहिला आहे त्याने एकदाच आम्हाला सांगितले की कोणते काम कोणत्या वेळी करायचे, ही आज्ञाही त्याने आम्हाला दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “येथे काय योग्य आहे काय नाही कोण नम्र आहे कोण नाही हे आम्हीच ठरवतो देवाला येथे याबाबतीत आम्ही लक्ष देण्याचे कामच ठेवले नाही.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading