नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२६४४
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥
कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुर पणें टाळितसां ॥ध्रु.॥
आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । काय असां निजले ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला माझे सर्व दु:ख माहित आहे तरी तुम्हाला त्याची किती वेळा आठवण करुन दयावी. देवा तुम्ही मला निष्ठूरपणे का टाळता आहात माझे दु:ख तुम्हाला का समजत नाही ? हे अनंता मायबापा मी तुला इतक्या वेळा आळवले आहे तरी देखील अजून तुझी कृपा माझ्यावर का झाली नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे जगदीशा मला तुमची कृपा हवी आहे ती कृपा तुम्ही माझ्यावर करा असे काय निजले आहात ?”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
