नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२६२६
म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निंश्चितीं कामरंगें ॥ध्रु.॥
नावडे ती कथा देऊळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥
कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागविसी ॥३॥
अर्थ
एखादया मनुष्याला हरी हरी म्हण असे सांगितले तरीही तो म्हणत नसला तर त्याच्या अंत:करणात काम क्रोधादी विकारांचा दरोडा पडला आहे असे समजावे. ज्याला कामवासनेने निश्चित भुलविले आहे त्याचे आयुष्य आणि धन हे दोन्ही यमाचे दूत नेतात असे समजावे. अश्या मनुष्याला कथा आवडत नाही देवळात जाऊन देवाचे दर्शन घेणे आवडत नाही कारण त्याचे सर्व लक्ष त्याच्या पत्नी धन आणि मुलांकडे लागलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू जर एक दिवस एक घटका हरीकथा ऐकली तर त्यावेळेला कोणी तुझ्या पत्नीला धनाला मुलांना नेणार आहे काय मग तू हरीकथा न ऐकून स्वत:ला का नागवितोस ?”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
