नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५६२
नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥
आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥
आळीकर आम्ही एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥
तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
अर्थ
मी ज्ञानी पणाचे ओझे माझ्या खांद्यावर वागवत नाही कारण माझ्या स्वामींची सेवा करण्याचे कार्य करण्याचा निर्धार मी केला आहे. स्वामीची आज्ञा प्रमाण मानण्याचा माझ्या मनाने निर्धार केला आहे आणि त्याने माझ्या सर्व संसाराचा भार निश्चयाने नाहीसा होणार आहे. आम्ही हरीचे म्हणजे आमच्या स्वामीचे हट्ट करणारे लेकरे आहोत आमच्या चित्तामध्ये त्याच्याविषयी एकनिष्ठ भक्ती भाव आहे.त्यामुळेच आमचा मायबाप स्वामी आम्हाला वाटेल तसे होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात माझी सेवा या प्रकारच्या जातीची आहे आणि माझा सर्व भार मी देवावर घातला आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
