नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५४३
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥
कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वचन चुकतां ॥ध्रु.॥
विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे जो चित्तें । अधर्माच्या तो त्यागी ॥२॥
आज्ञा पाळणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥
अर्थ
भूक पोटा पुरतीच असते परंतू संसारातील आशा-अपेक्षा मुळे संचय केला जातो. त्यामुळे फजिती होती संसारात पोटापुरती भूक भागवण्यासाठी पैसे कमवावेत असं न वाटता संसारातील अपेक्षा आणि आशा यामुळे संसाराचा भार वाढतच जातं आहे.एखादयाला मुडशी किंवा अजीर्ण झाले तर बरे व्हावे यासाठी त्याने डोक्यावरील किंवा दाडीचे केस काढले तर त्याने तो बरा होईल का तर नाही याउलट तो दोषास्पद होईल. त्याप्रमाणे साधुसंतांनी व शास्त्राने सांगितलेले वचन म्हणजे शब्द जर ऐकले नाही आणि जर अविहित कर्म मनुष्याने केले तर त्याचा संसारात आणि व्यवहारात दोन्हीकडेही नाशच होतो. विधी नुसारच जो विषयाचे सेवन करून कारणा पुरताच जो सहकार्य करतो, ज्याचे चित्त अधर्माने कधीही बाटले जात नाही तो खरा त्यागी आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्रुती व वेदाने ज्या अज्ञा आपल्याला सांगितल्या आहेत त्या आज्ञेचे पालन करावे व हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि त्या आज्ञेचे जर आपण पालन केले नाही तर आपल्याला पाप लागेल असे भय आपल्या जीवाला धरून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात या प्रमाणे आपण वागलो तर आपण साठवून ठेवलेला जो पुण्याचा ठेवा आहे त्याचे जतन होत असते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
