२५१८, अभंग :- आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५१८
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि ॥१॥
नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणी सांगातें ॥ध्रु.॥
वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥
तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥

अर्थ
आपल्याला वाढलेल्या पदार्थांमध्ये मीठ नाही ते आळणी झाले आहे असे आपल्याला समजले तर काही न बोलता मौन धारण करणे हे चांगले आहे. त्या स्वयंपाक करणाऱ्या वेड्या माणसाशी काही बोलून आपली वाणी खर्च करू नये. ज्यांना देहभावच राहिलेला नाही त्यांना कोणताही पदार्थ समोर आला तरी त्याची चव कळत नाही आणि ज्यांचा देहाभिमान जागृत असतो त्यांना हा पदार्थ चविष्ट नाही बेचव आहे असा भ्रम निर्माण होतो व तोच त्यांना माजीर पणा आणतो. तुकाराम महाराज म्हणतात स्वयंपाक कसाही असो तो जो कोणी करेल त्याचे कौतुक तरी करावे,जर स्वयंपाक आपल्याला आवडला नाही तर त्याला बाहेर तरी घालून द्यावे परंतु त्याला एकही शब्दांनी बोलू नये व आपली वाणी व्यर्थ खर्च करू नये.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *