नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४६९
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥
अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥
ब्रम्हांड कवळे आठवणेसाठीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥
तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न तुटता ॥३॥
अर्थ
ज्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये बांधलेल्या असतात त्या जरी दूर असल्या तरी आपल्या जवळच वसतात आठवण रुपी प्रकाशाने ते सर्व काळ प्रकाशितच रहात असतात.अंतरंगामध्ये एखाद्या गोष्टीची भेट होणेच उत्तम आहे कारण अंतरंगात झालेली भेट याविषयी वियोग कधीही होणे शक्य नाही. ब्रम्हांडाची आठवण जर केली तर ते ब्रह्मांड देखील आपल्या पोटात साठवले जाते परंतु त्याविषयी आपल्या चित्ता मध्ये वाव देणे गरजेचे आहे तरच ते ब्रह्मांड आपल्या पोटात साठवले जाते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या गोष्टीविषयी प्रेम तंतू दोरी जर तुटू दिले नाही तर आपल्याला त्या गोष्टीचा लाभ घरी बसल्या बसल्या होतो त्याप्रमाणे देवा विषयी आपण प्रेम तंतू दोरी टिकून ठेवली तर देवाचा लाभ आपल्याला घरी बसल्या बसल्या होतो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
