नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३९९
माझे हाती आहे करावे चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावे ॥१॥
मागति या भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥धृपद॥
बाळक धावोनि आड निघे स्तनी ॥ घालावा जननी प्रेम पान्हा ॥२॥
तुका म्हणे करी कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हाती ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचे सतत चिंतन करत राहावे आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्यावर कृपादान व तुमचे प्रेम मला देत राहावे एवढेच मला ठाऊक आहे. मागणाऱ्याचे भांडवल काय आहे तर देणाऱ्या दात्याची आठवण काढत रहावी व त्याच्याकडे जावे आणि देणाऱ्या दात्याचे त्याचे भांडवल काय आहे तर येणाऱ्या याचकाला दान देत राहावे व आपल्या नामाचे जतन करावे. बालकाचे काम काय आहे तर पळत जावे मातेच्या मांडीवर पडून अगदी निश्चिंत मनाने स्तनपान करावे आणि बालकाच्या स्तन मुखात घालून त्याला प्रेम पान्हा पाजावा हे आईने काम करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसे कासवी आपल्या दृष्टीनेच तिच्या पिलांचे पोट भरत असते अगदी त्याप्रमाणे तू तुझ्या कृपादृष्टीने माझे रक्षण कर माझे पालन-पोषण कर सर्वांच्या रक्षणाची सुत्र दोरी तुझ्याच हाती आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
