२३८९, अभंग :- कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणे नाही:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २३८९
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणे नाही यातीकुळ । लागो वेळ नेदावा ॥१॥
ऐसी काय जाणो किती । उतरती उतरले ॥धृपद॥
दावी वैकुंठीच्या वाटा । पाहाता मोठा संपन्न । अभिमान तो नाही अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
आले द्यावे भलत्या काळे । विठ्ठल बळे आगळा ।तुका म्हणे आळस निद्रा । नाही थारा त्या अंगी । ॥३॥

अर्थ

हरी भक्तांविषयी किती कृपावंत आहे याविषयी संत खूप वर्णन करुन सांगत असतात. त्याच्या भक्तांची जात कूळ तो तर विचारतच नाही परंतू त्यांचा उध्दार करण्यासाठी तो वेळ लावत नाही. असे कितीतरी भक्त आहेत की जे या भवसागराच्या पार उतरलेले आहेत व काही उतरतही आहेत ते किती आहेत हे देखील माहित नाही. हा हरी भक्तांना वैकुंठाच्या वाटा दाखवितो असा सर्वगुण संपन्न आहे. याच्या अंगी अभिमान तर नाहीच नाही परंतू भक्तांच्या भेटीकरता तो नेहमी वीटेवर उभा असून कधीही बसत नाही. त्याला शरण आलेला भक्त कोणत्याही भलत्या वेळेला येऊ दया त्यांचा तो अंगीकार करतोच असा हा विठ्ठल सर्वांपेक्षा वेगळा व बलवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठ्ठलाच्या अंगी आळस आणि निद्रेला अजिबात थारा नाही. ”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading