नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३२३
पुसावे ते ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनिया ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशी थार अज्ञान ते ॥धृपद॥
फळ ते चि बीज बीज ते ची फळ । उपनावे मूळ न पालटे ॥२॥
तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोने अलंकार मिथ्या नांव ॥३॥
अर्थ
अहंकाराचा नाश करून आपण आपल्यालाच विचारले पाहिजे की आपण कोण आहोत. बाकी सर्व काही बोलणे म्हणजे व्यर्थ असून देहाविषयी मीपणा धरणे म्हणजे हा मायेचा प्रकार आहे व देहाविषयी अहंकार धरून जे काही बोलले जाते त्याला आधार म्हणजे अज्ञान आहे. फळ हे बीजाचेच स्वरूप आहे आणि बीजाचे स्वरूप फळ आहे म्हणजे बीज आणि फळ हे भेद केवळ नावापुरते आहेत परंतु दोन्हीही एकच रूप आहेत त्यामध्ये बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात गव्हापासून अनेक प्रकार तयार होतात म्हणजे पोळी, करंजी, खीर इत्यादी परंतु त्यातील सत्य गहुच आहे आणि सोन्यापासून अनेक अलंकार तयार होतात परंतु अलंकार हे नांव मिथ्या असून त्यातील सत्य सोने आहे त्याप्रमाणेच जगत हे परमात्म्याच्या माये पासून उत्पन्न झाले आहे व जगतातील जेवढे काही नाम रूपे आहेत ते सर्व मिथ्या असून त्यातील सत्य एक परमात्माच आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
