२२७८, अभंग :- नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तू देव ऐसे करी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २२७८
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥धृपद॥
पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥२॥
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥४॥

अर्थ

देवा मला ब्रम्‍हज्ञान किंवा आत्मस्थिती भाव जर झाला तर त्यामुळे माझ्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊन तुझ्यात व माझ्यात अंतर पडले त्यामुळे मला तो आत्मस्थिती भाव व ब्रम्‍हज्ञान हे दोन्हीही नको केवळ तु देव आणि मी भक्त हेच नाते आपल्या मध्ये राहील असे तु कर. हे गोपीका रमना गोपिकांची रास करणाऱ्या देवा तु मला तुझे रूप दाखव मग मी तुझ्या चरणावर माझा माथा ठेवील. एकदा की तु मला देवा तुझे सगुण रूप दाखवले की मी तुझे श्रीमुख माझी तृप्त होईपर्यंत पाहिन तुला आनंदाने आलिंगन देईल आणि तुझ्यावरून माझा जीव उतरून टाकेन. देवा तु जर मला माझ्या हीत गुजा विषयी काही विचारले तर मी तुला ते सर्व सांगेन आणि आपण दोघेही एकातात बसून सुखाच्या गोष्टी करू. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे सगुण स्वरूप मला दाखवण्या विषय तु आता उशीर लावू नकोस माझ्या अंतकरणातील तळमळ तु जाणून घ्यावीस.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading