नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२४२
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वाया जाय ॥१॥
मुखी वाणी अमृतगोडी । मिथ्या भुके चरफडी ॥धृपद॥
पिळणी पाक करिता दगडा । काय जडा होय ते ॥२॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हाती ते चि मुखी ॥४॥
आपले केले आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
अर्थ
हरिकथा करून आणि वेदपठण करून काय उपयोग आहे जर सदाचारच नसेल तर सर्व व्यर्थ आहे. मुखात अमृतासारखी गोड वाणी आहे परंतु भूक लागली की ती सहनच झाली नाही की रागावतो आणि तरफड करतो मग ती अमृतवाणी ही व्यर्थ आहे. दगडाला शिजवले तर तो पिळण्या इतका नरम होईल काय? मधमाशी अनेक प्रकारचे मध गोळा करते परंतु त्याचा उपयोग पारदि आणि इतर लोकांसाठी जास्त होत असतो. लोभी मनुष्य आयुष्यभर केवळ धनच गोळा करतो परंतु त्याच्या हातात आणि मुखात शेवटी मातीच पडते. तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतः कमावुन स्वतःच खाईल त्याचेच पाय मी वंदीन म्हणजेच जो कथा वेद पठण करून त्याप्रमाणे आचरण करेल त्यालाच मी नमस्कार करीन.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
