नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२३९
लवविले तया सवे लवे जाती । अभिमाना हाती सापडेना ॥१॥
भोळिवेचे लेणे विष्णुदासा साजे । तेथे भाव दुजे हारपती ॥धृपद॥
अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांति ठायी ॥२॥
तये गांवी नाही दुःखाची वसती । अवघा चि भूती नारायण ॥३॥
अव घें चि जाले सोंवळे ब्रम्हांड । विटाळाचे तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ॥५॥
अर्थ
वैष्णवांच्या पुढे जो जसा लवेल तसेच वैष्णव त्याच्यापुढे लवतात कारण त्यांच्या हातात आपल्याला कधीही अभिमान सापडणार नाही. वैष्णवांना भोळेपणाचा अलंकार शोभून दिसतो कारण त्यांच्या ठिकाणावरून द्वैतपणा हरपलेला असतो. अर्चन , वंदन, नवविधाभक्ती असून दया, क्षमा, शांती वैष्णवांच्या ठिकाणी असते. वैष्णवांच्या ठिकाणी दुःखाची केव्हाच वस्ती नसते आणि सर्व भूती हा नारायणच आहे अशी त्यांची भावना असते. सर्व ब्रह्मांडच नारायण स्वरूप झाले त्यामुळे सर्वत्र सोवळे झाले आहेत आणि ते विकाररूपी विटाळाचे तोंड देखील पाहत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचा वैकुंठात देखील डंका गाजत असतो आणि भूमंडळावर देखील त्यांची अक्षय कीर्ति राहते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
