नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२२०
मंत्र चळ पिसे लागते सत्वर । अबद्ध ते फार तरले नामे ॥१॥
आशौच तो बाधी आणिका अक्षरा । नाम निदसुरा घेता तरे ॥धृपद॥
रागज्ञानघात चुकता होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक॥२॥
आणिका भजना बोलिला निषेध । नाम ते अभेद सकळा मुखी ॥३॥
तुका म्हणे तपे घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामे ॥४॥
अर्थ
वेदाचे मंत्र उच्चारतांना चुकले तर वेड लागते परंतु नाम कसेही घेतले ते चुकले तरीही माणसे तरतात यामागे अनेक पापी तरलेहि आहेत. अशुद्ध स्थितीत वेदमंत्र उच्चारता येत नाही त्यांना बाधा असते परंतु नाम हे झोपेत असताना देखील उच्चारले, घेतले तरी घेणारा तरतो. गायना मध्ये रागाचे ज्ञान नसेल किंवा गायन करताना चुकले तर वेळप्रसंगी त्याचा घात ही होतो परंतु नाम केव्हाही घेतले तरी ते सर्वकाळ शुभदायकच असते. भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत व अनेक प्रकारांमध्ये वेगवेगळे प्रकारचे नियम विधिनिषेधने घातलेले आहेत परंतु नाम घेताना कोणत्याही प्रकारचा नियम नाही ते कधीही , कोणीही , केव्हाही घेतले तरी पुण्यच होते. तुकाराम महाराज म्हणतात तप अनुष्ठान इत्यादी कर्म करताना चूक झाली तर घात ही होण्याची दाट शक्यता असते परंतु नाम घेताना कोणत्याही प्रकारची अडचण नसते नाम घेतल्यावर वैशा देखील तरुण जातात यामागे गणिका नावाची वैशा केवळ अंतकाळी राघोबा असे नांव घेतल्याने तरुन गेली आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
