२२१५, अभंग :- अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळी न घडे साधन । उचित विधि:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २२१५
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळी न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणे जाणे खेपा येणे चि एके खंडती॥धृपद॥
उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे । दासा मी चि साहे मुखे बोले आपुल्या ॥२॥
भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी । तुका म्हणे नासी कुतऱ्याचे कपाळी ॥३॥

अर्थ

कलियुगामध्ये परमार्थ करण्यासाठी सर्व वाटा क्षीण झाल्या असून कोणत्याही साधनाने परमार्थ घडत नाही. उचित विधिविधान हे कळत नाही आणि कोणत्याही प्रकारे घडत नाही. केवळ एक भक्ती पंथ परमार्थ करण्यासाठी खूप सोपा आहे ते पुण्याला प्रोत्साहन देऊन पापाची निवृत्ती करीत असते. आणि केवळ याच भक्ती पंथाने आपल्या जन्ममरणाच्या खेपा खंडित होतात. विठोबा आपले दोन्ही हात वर करून भक्तांना आपल्याजवळ बोलवत आहे. आणि माझ्या शरण आलेल्या दासांचे सर्वकाही मी सहन करतो असे तो स्वतः च्या मुखाने बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे भाविक हरी वर विश्वास ठेवतात त्या भाविकांना हरीने या भवसागरातून पार उतरविले आहेत. परंतु कुर्तक्याच्या नशिबामध्ये नाशच आहे.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading