नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २१८९
तेव्हा धाले पोट बैसलो पंगती । आता आम्हा मुक्तिपाग काई ॥१॥
धावा केला आता येईल धावोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥धृपद॥
गायनाचा आता कोठे उरला काळ । आनंदे सकळ भरी आले ॥२॥
देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्ये कोठे वाव राहो सके ॥३॥
तेव्हा जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशले ॥४॥
तुका म्हणे आह्मी जिंतिले भरवसा । देव कोठे दासा मोकलितो ॥५॥
अर्थ
ज्यावेळी मी देवा तुझ्या पंगतीला येऊन बसलो त्यावेळेस माझे पोट भरल्यासारखे झाले आता आम्हाला मोक्ष देखील दरिद्री प्रमाणे आहे. तुझा धावा केला की तु लगेच धाऊन येशील याविषयी काहीच संदेह राहिला नाही. आता तुझे नाम घेण्यासाठी देखील मला वेळ कुठे आहे कारण सर्वत्र आनंद भरलेला आहे. देवाशी माझी सख्यत्व झाले त्यामुळे आता कोठेही विषमतेचा ठाव राहिलेला नाही व राहणे ही शक्य नाही. हरीचे प्रेम ज्यावेळी माझ्या हृदयात भरले हरीच्या प्रेमाने ज्यावेळी माझ्या हृदयात प्रवेश केला त्यावेळी माझ्या अंतकरणातील काम क्रोध आणि अहंकाराची बाध झाला व त्यांची वाताहत झाली. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाला जिंकले आहे याविषयी भरवसा आम्हाला झाला आहे आणि तसेही देव त्याच्या भक्तांना कोठे मोकलत असतो काय म्हणजे विना आश्रित ठेवत असतो काय?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
