नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २१५९
भक्त म्हणऊनि वंचावे जीवे । तेणे शेण खावे काशासाठी ॥१॥
नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥धृपद॥
अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥
तुका म्हणे कोठे तगो येती घाणी । आहाच ही मनी अधीरता ॥३॥
अर्थ
काही मनुष्य स्वतःला थोर भक्त म्हणून घेतात आणि देवाची सेवा करण्याविषयी कामचुकारपणा करतात मग स्वतःला भक्त म्हणून काम चुकारपणा करण्याचे शेण कशासाठी खावे? असे लोक करदुड्याला लंगोटी बांधतात गळ्यामध्ये माळा मुद्रांचे भूषण घालतात पण खरे तर त्यांनी परमार्थाचा नाश च केलेला असतो असे लोक देवळातही जातात आणि उगाचच अडचण करतात. अशा लोकांनी देवाची सेवा करण्याचे अंगिकारले असते परंतु देवाच्या सेवेपासून ते अंतरतात म्हणजे खापराचा स्पर्श जरी परिसाला झाला तरी त्याचे सोने होत नाही त्या न्यायाने यांची गती झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनातच आधीरता आहे म्हणजे धैर्यच नाही अशा घाण लोकांच्या मनामध्ये परमार्थ तप धरील काय?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA