नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २४२३
वाचेचिया आळा कवळिलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥
सुलभ झालें सुलभ झालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥
नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥
तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हातीं आणियेला ॥३॥
अर्थ
वाचेच्या द्वारा आम्ही निर्गुण ब्रम्हाला नामाने आळा घालून कवळीले आहे व आमचा त्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी होणारा इतर सर्व श्रम आम्ही चुकविला आहे. ते ब्रम्ह आमच्यासाठी इतके सुलभ झाले आहे इतके सुलभ झाले आहे की ते अगदी जवळ ,आमच्या जवळ पंढरीला आले आहे. आम्ही एका दमामध्ये नाम रुपी गाढोडे बांधले आहे व त्यामुळे इतर सर्व साधना नामा पुढे आम्ही बाजूला सारून दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ब्रम्ह प्राप्तीकरता इतर अनेक साधनंची वाट चुकवली असून नाम साधनेमुळे अनेक जन्मांच्या शेवटी ज्या ब्रह्माची प्राप्ती व्हायची होती ते ब्रम्ह आम्ही याच जन्मी हाताशी आणले आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA