२४१६, अभंग :- वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२४१६
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥

अर्थ

देवा मी तुझा खरा भक्त आहे असा माझा लौकिक तु विनाकारण वाढविला आहेस मी भक्त आणि तु देव हा खोटा भेद तु निर्माण केला त्यामुळे आपल्या दोघात विनाकारणच वाद निर्माण झाला आहे. माझ्या मते देव झालाच नाही कारण त्याला भुकेला आणि जेवलेला यांच्यातील फरक कळतो काय? देव तर नाहीच पण मी ही त्याचा खरा भक्त नाही कारण मी केवळ शब्द ज्ञानाचे अलंकार माझ्या वाणीला लावून माझी वाणी गौरवीत आहे मी जे काही विशब्द ज्ञान बोलतो त्याचे खरे तत्व माझ्या मनात बिंबतच नाही. देवा तुझी प्राप्ती होईल म्हणून मी तुझे ध्यान सतत करत राहिलो आणि त्यामुळे मी संसाराकडे लक्ष ही दिले नाही आणि आता मला तुझ्या पायाची प्राप्ती ही झाली नाही आणि माझ्याकडून संसारही घडला नाही त्यामुळे दोन्ही चा आधार तुटून मी एकटा परदेशी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याविषयी जर मला मागे समजले असते तर मी मला तुझे वेडच लावून घेतले नसते.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading