नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३२९
सर्वविशी आह्मी हेचि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिले चि नाही मागे परतोनी । जिंकिला तो क्षणी क्षण काळ ॥धृपद॥
नाही पडो दिला विचाराचा गोवा । नाही पाठी हेवा येऊ दिला ॥२॥
केली लाग वेगी अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
कोठे मग ऐसे होते सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥
तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आता नाही गोवी कशाची ही ॥५॥
अर्थ
सर्व गोष्टी विषयी आम्ही लाभ करून घेतला आहे कारण आम्ही आमच्या स्वामी पांडुरंगाची चरणसेवा साधली आहे. स्वामी ची चरण सेवा करतांना आम्ही प्रपंचा कडे मागे परतून देखील पाहिले नाही त्यामुळे हरीचे नाम घेताना आम्ही क्षणो क्षणाला काळाला जिंकले आहे. हरीचे चिंतन करत असताना आम्ही मनामध्ये कोणत्याही विषयी विचार येऊ दिला नाही आणि पोटातही कोणत्या प्रकारचा हेवा येऊ दिला नाही. हरिच्या नामस्मरणा विषयी, चींतना विषयी आम्ही लवकर घाई करून तातडी केली आणि मनातील वाईट भावना काढून टाकल्या. हरीचे नाम स्मरण व चिंतन मनुष्य देहावाचुन इतर कोठेही घडणे शक्य आहे काय तर नाही व सांगताही येत नाही त्यामुळे संसाराविषयी च्या प्रत्येक इच्छेला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मनुष्यदेहात येऊन आमच्या स्वामीची चरणसेवा व त्याचे चिंतन , नामस्मरण करण्याचा लाभ आमच्या नशिबी बांधून घेतला आहे त्यामुळे आम्हाला आता कोणत्याही प्रकारची अडचणच राहिली नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
