ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.937

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३७

देह दंडुनी पाईक अनुसरला जीवें । तंव स्वामियाचें गूज हातासी आलें ॥१॥ पाईकपणे गेलें स्वामी होउनी ठेले । परी नाहीं विसरलें स्वामियातें ॥२॥ पाईकपण ऐसा आठवुचि नाहीं । स्वामीवांचुनी कांहीं जाणेचीना ॥३॥ बापरखुमादेविवरू विठोजी उदारू । पाईक तो साचारू स्वामी केला ॥४॥

अर्थ:-

भगवद्भक्त देहाला कष्ट देऊन जीवाभावाने भगवंताची सेवा करतात. म्हणूनच तो भगवान त्यांच्या हाती येतो. म्हणजे ते भक्त भगवत्स्वरूप होतात. ते भक्त जरी भगवत्स्वरूप झाले तरी देह असेपर्यंत आपण त्या भगवंताचे सेवक आहोत हे ते विसरत नाहीत. ‘मीचि होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ॥’ या प्रमाणे ते सेवा करितच असतात. अशी जरी सेवा करीत असले तरी त्यांच्याठिकाणी आपण सेवक आहोत अशा तऱ्हेचा अभिमान राहात नाही. कारण ते एका भगवंताशिवाय दुसरे काही जाणत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाच मी खरा स्वामी केला.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading