ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.737

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३७

सांवळा सकुमार लावण्य त्रिभुवनीं । अवचिता आंगणीं देखिला रया ॥१॥ आळवितां नयेची सचेतनी अचेत । भावेंचि तृप्त माझा हरि ॥२॥ अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनि उभा । विज्ञानेसी शोभा दावी रया ॥३॥ ज्ञानदेवा सार सांवळिये मूर्ति । निवृत्तीने गुंति उगविली ॥४॥

अर्थ:-

सर्व त्रिभुवनांत अत्यंत सुंदर सुकुमार असा श्रीकृष्ण माझ्या अंगणांत खेळतांना मी पाहिला. त्याला जवळ येण्याबद्दल मी काकुळतीस येऊन बोलाविले. पण तो येत नाही. परमात्मस्वरूपाविषयी विचार केला तर सचेतन जीवांत असून तो अचेतनच असतो. पण त्याला एकच आवड आहे ती ही की भक्ताच्या निष्कपट भावाने तो तृप्त होऊन तो माझा श्रीकृष्ण प्राप्त होतो. अज्ञानी जीवामध्ये तो असून दिसत नाही. आणि ज्ञानी लोकांच्या अंतःकरणांत सहज येऊन अंतःकरणाच्या ज्ञानाने शोभा दाखवितो. माझ्या निवृत्तीरायांनी ज्ञान अज्ञान व विज्ञान हा गुंता उकलुन त्या श्री कृष्ण मूर्तीचे मला दर्शन घडवले असे ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading