ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.726

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२६

प्रकृतीचे पूजन प्राप्तीवीण जाण । प्राप्ती सिंचन दोन्ही वाया गेलीं ॥१॥ पूजन कवणा करुं सिंचन कवणा करुं । नाहीं नव्हे तें धरुं गुरुमुखें ॥२॥ रखुमादेविवरु गुरुमुखा भ्याला । होता तो लपाला नाही ते ठायीं ॥३॥

अर्थ:-

प्रकृति पूजन म्हणजे माया कार्य जो प्रपंच त्याचा सत्यत्वबुद्धीने आजपर्यत केलेला आदर फळावांचून फुकट गेला त्या प्रपंचाची प्राप्ती आणि त्याच्याविषयी केलेला आदर परमार्थदृष्टिच्या विचाराने दोन्ही फुकट गेली. परमात्मदृष्टिच्या विचारांत द्वैत प्रपंचाचा स्वीकार किंवा त्याच्या विषयी आदर करण्याला जागाच नाही. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रंपचाचा अभाव होतो. ते परमात्मस्वरुप गुरुमुखाने प्राप्त झालेले मनांत धरु. रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल. ते गुरुमुखाने सांगितलेल्या निर्गुण स्वरुपाला भिऊन सगुण झाले. ते पुन्हा निर्गुण झाले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading