ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.717

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१७

सोळा कळी चंद्र पूर्णिमे पूर्ण बोधु । संतजनां उद्बोधु सागरन्यायें ॥१॥ नित्यता पूर्णिमा हृदयीं चंद्रमा । अलिंगन मेघश्यामा देतु आहे ॥२॥ ज्ञानदेवा मोहो निःशेष निर्वाहो । रुपी रुप सोहं हो एका तेजें ॥३॥

अर्थ:-
पौणीमेच्या दिवसी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण झाला असता सागराला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे श्रीहरिस पाहता संतांच्या हृदयरुपी सागरास भरती येते. नित्य परिपूर्ण परमात्मा जो मेघश्याम श्रीहरि तो ज्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य उदित आहे त्यास अंतःकरणवृत्ति अलिंगन देण्याकरिता सागराप्रमाणे उचंबळुन येते. माझ्या ठिकाणचा देह अहंकार व मोह निःशेष जाऊन परमात्मस्वरुपाचा सोहं भावाचा उदय झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading