ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.680

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार ६८०

स्मरो कैसेंनी विस्मरों कैसेंनी । दोहीपरी मज अटी रया ॥१॥ पाडु पडिला विषम ठायीं । देतां घेतां नुरेचि कांहीं ॥२॥ रखुमादेविवरू विठ्ठलु नेणिजे । तंव तोचि तयासी अटीवी रया ॥३॥

अर्थ:-

मी आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण किंवा विस्मरण कसे करावे? ते माझ्याकडून होणे शक्य नाही. ब्राह्मण व्यक्तिला ब्राह्मणपणाचे स्मरण किंवा विस्मरण होत नाही. याचे कारण त्या व्यक्तिला ब्राह्मणपणाचा निःसंदेह बोध असतो. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी ब्रह्मबोधाचा दृढनिश्चय असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्मरण किंवा विस्मरण कसे होणार? प्रथम आपल्या स्वरूपाचे विस्मरण होणे आणि नंतर विस्मरणाच्या नाशाकरिता स्मरण करणे या दोन्हीही खटपटीच आहेत. द्वैताविषयी माझ्या ठिकाणी किंमत नसल्यामुळे देण्याघेण्याला तरी उरले काय? काहीच नाही. रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल जोपर्यंत जाणला नाही तोपर्यंत श्रीविठ्ठल त्याला कष्ट देईलच.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading