ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.673

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७३

बारावें वरतें तेरावें हरपलें । चौदावें देखिलें चौडोळा ॥१॥ चौघांची भाज मी नहोनियां गेलें । तंव अनारिसे महाकारण देखिलें ॥२॥ बापरखुमादेविवरु भूतजाता वेगळे । पराहूनि परतें पांगुळलें ॥३॥

अर्थ:-

दहा इंद्रियें, चित्त आणि अहंकार हे बारा व त्याच्यावर असणारी बुद्धि तिही लय पावली. तेव्हां चार वेदांच्या सहाय्याने चौदावे आत्मतत्त्व पाहिले. पण चारी वेदाची मी दासी न होता त्यांना सोडून गेले.तो विलक्षण महाकारण परमात्मतत्त्व पाहिले. माझे पिता व रखुमाईचे पती तें परमात्मतत्त्व यश्चावत् भूतमात्राहून वेगळे, प्रकृतिहून पलिकडे असलेले व अत्यंत श्रेष्ठ त्याच्या ठिकाणी मी लय पावलो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading