👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९२
साउमा जंव जाये तंव हृदयींच आहे । चित्त विकासून पाहें चित्तामाजी ॥१॥ तंव चर्तुभुज हरि हदयमंदिरी । तया नमन करी विज्ञानेसी ॥२॥ शांती धरूनी वाही आपेआप पाही । नमनी निर्वाही न्याहाळिला ॥३॥ ज्ञानदेवा रूप बिंबोनी समीडप । प्रपंच दुःखरूप सुख जाले ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याचा कानोसा घेऊन तो कोठे आहे असे पहावयास गेले तर तो माझ्या हुदयातच आहे. असे कळले. चित्त शुद्ध करून त्याला पहा, म्हणजे तो चित्तामध्ये आपोआप प्रगट होईल म्हणजे तो तुझ्या इदयातच दिसेल त्या मूर्तीला हे माझेच स्वरूप आहे असे जाणून नमन कर. चित्ताचे धैर्य धरून त्या मूर्तिला आपल्याच ठिकाणी पहा आणि तो परमात्मा मी पाहीला म्हणजे ज्ञानाचा विषय केला असे मात्र म्हणू नकोस. ते रूप आमच्या अंतःकरणात आम्हाला पहावयास मिळून दुःखरूप प्रपंच सुखरूप दिसु लागला. असे माऊली ज्ञानदेव सांगातात.