ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.266

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६६   

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तु अवगुणु रे भ्रमरा ॥ चरणकमळदळु रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळु रे भ्रमरा ॥ सुमनसुगधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥ सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥

अर्थ:-

मी व माझे या शब्दाने गुंजारव करण्याच्या जीवरुपी भ्रमरा तु त्याला सोडुन दे कारण ते अवगुण आहेत आणि भगवंताच्या चरणकमालाच्या ठिकाणी असलेला जो सुगंध रुपी आनंद तो तू निश्चळ होऊन भोग. मनाच्या मागे फिरणाऱ्या जीवरुपो भ्रमरा तू आपले शुद्ध अंतःकरण करुन, परमात्म्याच्या ठिकाणी असलेला जो सुगंधरुपी आनंद आहे तो तू स्थिर होऊन भोग माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल याचे चरणकमलाच्या ठिकाणचा आनंदरुपी सुगंध तू सेवन कर म्हणजे आनंद प्राप्त होईल असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading