👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५८
सकळ संप्रदाय श्रीहरि । जो बैसोनि जप करी । जिव्हे महादेवाचे अंतरी । सर्वकाळ वसतसे ॥ रामनामें जप करी । तोचि तरे भवसागरीं । पितरांसहित निर्धारी । वैकुंठपुरीं पावले ॥ नित्य सत्य समाधान । निर्मळ करावें मन । नित्य तयासीे नारायण । वैकुंठवास करील ॥ बापरखुमादेविवर सिद्धि । तरुणोपाय हेचि बुद्धि । कृपा करील कृपानिधी । ऐसिया भक्तांशी जाणावें ॥
अर्थ:-
महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो. जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.