ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.912

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९१२

आजिवरी होतें मी मोकाट । तंव डोळे फुकट मोडा तुम्हीं ॥१॥ समर्थाचे अंगी पडलें अवचिती । तुम्हां ऐसी किती चाळविली ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलाची घरवात जाले । जन्मवरी एकांत करूनी ठेले ॥३॥

अर्थ:-

आजपर्यंत मी स्वैर असल्यामुळे लोकांना डोळे घालण्याची फुकट खटपट केली. खटपट करीत असता सहजच समर्थाच्या पदरी पडलें. तुमच्या सारखे भासणारे आजपर्यंत मी किती एक चाळविले. आतां तुमच्या पदरांत पडल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या घरादारांत मीच होऊन जन्मभर एकांत करून राहिले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading