ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.660

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६०

ध्यान धारणा मंत्र साधन । त्रिकाळी जपन अजपा सिद्धी ॥१॥ नटकेचि अटकु ठाईचेंचि निर्गुण । मज कवणे ठाई घेऊनी गेलें ॥२॥ देश वाढले दीस अटले । चहूं द्वारे कोंदलें ब्रह्मतेज ॥३॥ रखुमादेविवरू अठांगी आगळा । सप्तधातु वेगळा ब्रह्मउदधी ॥४॥

अर्थ:-

ध्यान व धारणा ही समाधीचे अंगे आहेत, नाममंत्र ही साधने आहेत. अजपा सिद्धीचे जपन म्हणजे अजपा जप त्रिकाळ चालू आहे. अशी साधने केली तरच तो परमात्मा प्राप्त होईल. अशी आडकाठी नाही. तो सहज निर्गुण आहे. तो घेऊन मला कुणीकडे गेला हे समजत नाही. म्हणजे त्याने मला परमात्मरूप करून ठेवले.तो देश कालापेक्षाही मोठा आहे. सर्वत्र ठिकाणी तें ब्रह्मतेज कोंदलेले आहे. म्हणून अपार ब्रह्म समुद्र जो रखुमादेवीचे पती, तो अष्टांगरूप समाधीहून व सप्तधातुरूपी शरीराहून वेगळा आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading