नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८६१
बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥
हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥
तुका म्हणे दिशाभुली । झाल्या उफराटी चाली । निवाड्याची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
अर्थ
जमिनीत बी पेरले त्याला पाणी दिले आणि त्याचे रक्षण केले तर त्याला नक्कीच फळ येईल असा भरवशाच ठेवावा. परंतू असे काहीच न करता केवळ अपेक्षा धरली की आपल्याला फळ मिळावे आणि काकूळतीला येऊन बसावे असे केल्याने काहीही होणार नाही तर केवळ आपलेच नुकसान होईल. हा देह म्हणजे अडचणीचे मोठे ठिकाणच आहे आपण यामध्ये जसा भाव ठेऊ तसेच आपल्याला फळ मिळते. परंतू काही लोक संकूचित वृत्तीचे असतात ते असे संकोचून जीवदशाचेच जतन करतात. धनलोभी मनुष्य पुष्कळ धन असते तरी देखील चोरीला जाईल या भीतीने मातीत पुरुन ठेवतो आणि जशी रांड स्त्री म्हणजे विधवा स्त्री मर्यादीत धनावर आपले जीवन जगते तसा हा धनलोभी जीवन जगत असतो. तशीच गत जीवाची झाली आहे आत्मसुख आपल्या शेजारी आहे तरी देखील प्रमाणेच जीव दु:ख भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मनुष्याला जर दिशाभूल झाली तर तो उलटया दिशेने चालत असतो. त्याप्रमाणे संसारातील जीव देखील उलटया दिशेने चालत आहेत हे मी अनुभवाने व स्वत:च्या साक्षीने बोलत आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA