नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७८४
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥
नव्हेचि तुम्हांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तंव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥४॥
अर्थ
मी जेथे जातो तेथे मला केवळ नुसकानचं दिसत आहे माझ्या डोळ्याने काही लाभ दिसतच नाही. माझ्या कपाळाची भाग्य रेषा जर चांगली असती तर मला एवढे कष्ट भोगावे लागले असते काय. देवा तुम्ही माझा अंगिकार करत नाही आणि माझ जो संसार होता तोही आता माझ्यापासून अंतरला आहे. जेवढा सुख आणि दुःख रुपी भोग होता तेवढा भोगला खरा पण आता मात्र काळ माझ्या आयुष्याचे भांडवल नेता आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी कुठं तुझ्या नादी लागलो काय माहित तुझ्या जर नादी लागलो नसतो तर मी माझ्या जीवाला मुकलो असतो काय?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
