नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७६९
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
होतें तेंचि झालें । नाम ठायींचें पडीलें ॥ध्रु.॥
उतरलें डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥
हिंडवितां देशोदेश । तुका म्हणे नाहीं नाश ॥३॥
अर्थ
सोन्याचे किडूकमिडूक जमा करुन त्याची एकच लगड तयार केली तर ते लगड तयार करताना पूर्वी अलंकार होते नंतर ते अलंकार आटविले, म्हणजे ते लगड पूर्वी अलंकार होते परंतू आटवल्यानंतर पुन्हा मूळ स्वरुपात म्हणजे सोन्यातच त्याचे रुपांतर झाले व पुन्हा त्याला सोने हेच नाम प्राप्त झाले. मग ते सोने डाईत घालून चांगले अग्नीत सुलाखले तर मग ते उत्तम कसाला उतरते. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्या प्रकारे सोने कोणत्याही देशोदेशी हिंडवले तरी त्याचे जे मूल्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
