नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७५३
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥
नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥ध्रु.॥
सत्याविण काय उगीच लांबणी । करियाची वाणी येर भूस ॥२॥
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा ज्यावेळी मी परमार्थ करण्यास सुरवात केली त्यावेळी मला तुमची प्राप्ती होईल असे शुभशकुन होऊ लागले परंतू आता तर तुम्ही तोंड लपून बसला आहात. देवा केवळ शब्दानुशब्द जोडून अभंगाची रचना करण्याचे आणि वरवर केवळ निष्कामता दाखवण्याचे तुम्हाला मागितले नव्हते. परमार्थामध्ये सत्य वागण्याला महत्व आहे सत्याविणा केवळ सोंग दाखवणे कार्याची लावणी करण्यात काय अर्थ आहे आणि आपल्या वाणीने जे काही बोलू ते कार्य सफल झाले तर चांगले, नाहीतर आपली वाणी ही व्यर्थ भूशासारखी ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पांडूरंगा अशा प्रकारची फसवणूक कोणाची करावी व कोणाची नाही करावी हे तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करुन का नाही पाहात.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
