नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७२०
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥
कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळों येतो ॥२॥
होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें झालों युक्तिकळाहीन ॥३॥
तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥
अर्थ
देवा वेद शास्त्र पुराण यांनी तुझ्याविषयी जे गुण वर्णन गायिले आहे ते आता लज्जेने तोंड काळे करुन राहीले आहेत असे मला वाटते कारण मी तुला इतके आळविले तरी देखील तू माझ्या चित्ताचे समाधान केले नाही. अरे देवा जर तू आमच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलला नाहीस तर आम्हाला सुख तरी कसे वाटेल आणि प्रेम नसताना केवळ आपल्यामध्ये भेट झाली तर त्याचा काही उपयोग आहे काय ? एखादा मनुष्य दुस-या मनुष्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याला प्रेमाने भेट देण्याऐवजी त्याला कोपरखळी मारुन हात आडवा केला तर त्या दोघांमध्ये माया किती आहे हे लगेच कळून येते. देवा माझ्याकडे ज्या काही शक्ती व युक्ती होत्या त्या सर्व मी खर्च केल्या आहेत आता यापुढे माझ्याकडे कोणत्याही प्रकारच्या शक्ती व युक्ती शिल्लक राहिल्या नाहीत मी शक्ती व युक्तीहीन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही सर्व समर्थ आहात त्यामुळे माझ्यासारख्या दुर्बलाची सेवा तुम्हाला कोठे पावेल ?”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
